जळगाव: जामनेर शहरातून एक कळवण्यात बातमी समोर येत आहे आपल्या चिमुकल्या बाळाला झोक्यात झोपूवन आई कामावर निघून गेली, तो झोक्यातून पडू नये म्हणून त्याला रुमाल बांधला, मात्र हाच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला आहे. उठल्यानंतर झोक्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात बांधलेल्या रुमालाचा गळफास लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत घडली आहे. निर्भय वसंत इंगळे असं अवघ्या एका वर्षाच्या मयत चिमुकल्याचं नाव आहे. दहा दिवसांपूर्वीच निर्भयचा पहिला वाढदिवस साजरा झाला होता.
जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कामावर जाण्यापूर्वी मुलाला झोक्यात झोपविले. निर्भय झोक्यातून पडू नये म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या धाकट्या बहिणीला निर्भयवर लक्ष ठेवण्यात सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली.
निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील निर्भयकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. त्यानंतर जेवण करून परतल्यानंतर पुन्हा निर्भयला पाहण्यासाठी मावशी केली असता, निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला दिसून आला. ते पाहून निर्भयच्या मावशील धक्काच बसला. तिने त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने लक्षात आल्याने तिने निर्भयच्या आई व वडिलांना तात्काळ बोलावून घेतले.
आई, वडिलांनी तातडीने निर्भयला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते. दुर्दैवी घटनेने गिरीजा कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


