अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की या हवामान वादळांची नावे कशी आणि कुठे ठेवली जातात विशेष म्हणजे दरवेळी येणाऱ्या वादळांची नावे हटके आणि खास असतात
चला तर मग जाणून घेऊयात या वादळांची नावे कशा पद्धतीने ठेवली जातात आणि याची प्रक्रिया नेमकी काय आहे
हवामान खात्याने आतापर्यंत 169 वादळांची नावे जाहीर केली आहेत या नावांना जागतिक मेट्रोलॉजिकल डिपारमेंट पॅनलने एप्रिल 2019 मध्ये मान्यता दिली होती या यादीनुसारच वादळांची नावे ठरवली जातात.
विशेष म्हणजे असानी वादळाचे नाव यावेळी श्रीलंकेने दिले आहे यानंतर थायलंडचे ‘सित्रांग’ युएईचे ‘मेंडस’ आणि येमेनचे ‘मोछा’ अशी वादळांची नावे दिली आहेत
वादळाचे नाव अटलांटिक प्रदेशात 1953 मध्ये कराराद्वारे करण्यात आले, तर हिंद महासागर क्षेत्रात हे 2004 मध्ये सुरू झाले महत्वाचे म्हणजे भारताच्या पुढाकाराने या भागातील अनेक देशांनी वादळांना नाव देण्यास सुरुवात केली


