अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील इंद्रा पिंप्री येथे ग्रामपंचायत कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणच झाले नसल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला. याप्रसंगी ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
एक मे महाराष्ट्र दिनी, तालुक्यातील इंद्रा पिंप्री येथे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणच झाले नाही. याबाबत गावाचे सरपंच आणि उपसरपंच यांनी तहसीलदार यांच्या कडे तक्रार केली आहे. ध्वजारोहणसाठी अनुपस्थित राहिलेल्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच रवींद्र भिल, आणि उपसरपंच शोभा बाई चंद्रकांत पाटील यांनी निवेदनातून केली आहे.


