येत्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्क्यांची घसरण होऊ शकते. खाद्यतेल कंपन्यांनी केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक मार्केटमध्ये वायदे बाजारात सध्या किंमतीत घसरण सुरु आहे. त्याचा फायदा स्थानिक बाजारात दिसून येत आहे. भावात घसरण होत असल्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी केंद्र सरकारने किंमतीत बदलाच्या सूचना केल्या होत्या.
फॉर्च्युन ब्रँडचे मालक अदानी विल्मर तसेच जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी एडिबल आणि फॅट्स इंडिया यांनी खाद्यतेलाच्या किंमतीत क्रमशः 5 रुपये प्रति लिटर आणि 10 रुपये प्रति लिटर कपातीचा निर्णय घेतला आहे.
या कपातीचा फायदा येत्या तीन आठवड्यात ग्राहकांना मिळेल, असेही कंपन्यांनी म्हटले आहे.

