अकोला: जिल्ह्यातल्या दुर्गम भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत संतापजनक अशी घटना समोर आली आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थीनींवर शिक्षकांनी दोन महिने लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय.
दोन शिक्षकांनी केलेला हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना अटक करून न्यायालयात हजर केलं. सहाय्यक शिक्षक सुधाकर ढगे (sudhakar dhage)(वय ५३) आणि राजेश तायडे(Rajesh tayde) (वय ४५) यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोल्यापासून 30 ते 40 किमी अंतरावर असणाऱ्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतच वर्ग आहेत.
द्विशिक्षकी असलेल्या या शाळेत चार मुली आणि पाच मुलं शिकतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत दोन्ही नराधम शिक्षकांनी मुलींचा लैंगिक छळ केला. शिक्षकी पेशाला काळिमा फास त्यांनी चार मुलींवर दोन महिने लैंगिक अत्याचार केले.
शिक्षकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला घाबरून मुलींनी शाळेत जाणं बंद केलं.
मुली शाळेत का जात नाही याबद्दल पालकांनी विचारणाही केली. पण त्या भीतीने काहीच बोलत नव्हत्या. शेवटी एका मुलीने पालकांना खरं कारण सांगताच त्यांना धक्का बसला. इतर मुलीच्या पालकांना याबाबत माहिती दिली आणि त्यांच्यासोबतही असं घडल्याचं समोर आलं.शेवटी पालकांनी पोलिसात धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. या शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. गटशिक्षण अधिकाऱ्यांना कारवाईचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर दोन्ही शिक्षकांना ६ एप्रिलपासून बडतर्फ करण्यात आले.(An action report was submitted to the Group Education Officer. After that, both the teachers were dismissed from April 6.)


