यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. एवढेच नाही तर या तरुणाने पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण केली.
सविस्तर वृत्त असे कि, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एक तरुण पाठलाग करीत होता. दरम्यान, गुरुवारी शाळेतून घरी येत असताना त्याने मुलीस मोबाइल क्रमांक मागितला. मुलीने घरी येऊन हा प्रकार सांगितला. बसस्थानकासमोर हा तरुण दिसला. मुलीने लागलीच वडिलांना माहिती दिली. तेव्हा वडिलांनी तरुणास जाब विचारला असता त्याने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली व त्याची दुचाकी सोडून पळून गेला होता. याप्रकरणी यावल पोलिसात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.