जळगाव: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमीत्त राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारत यांच्यावतीने राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार रिधी जान्हवी फोंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्रलेखा मालपाणी याना नुकताच जाहीर झाला.
रविवार दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी, टिळक रोड, पुणे येथील डॉ. नीतू माड्के आय.एम.ए हाऊस या सभागृहात ह्या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार जनशक्तीचे संस्थापक माजी मंत्री बच्चूभाऊ कडू,लातूर विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योतीताई मेटे, आदर्श गाव संकल्प सरपंच पद्मश्री डॉ. पोपटराव पवार ह्या मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण
सोहळा संपन्न होणार असुन ह्या कार्यक्रमासाठी ट्रीपल महाराष्ट्र केशरी एसीपी विजय चौधरी, भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अविनाश सकुंडे, समर्थ जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक जगन्नाथ माने पाटील,सेंद्रीय शेती असोसिएशनचे राजाध्यक्ष कृषी भूषण अंकुश पडवळे, राष्ट्रभक्ती जनविकासाचे सुनील मोर तसेच राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने ईत्यादी मान्यवरांची प्रमुख ऊपस्थिती राहणार आहेl.
जळगाव जिल्हातील व तालुक्यातील गावात जल्मला आलेल्या चित्रलेखा मालपाणी सामजिक कार्यात गेले 5-6 वर्षे झाले तत्पतेने कार्य करत आहे.


