संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी मिळणार असा निर्णय राज्यच्या परिवहन विभागाने घेतला, यामुळे एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीच सरकार सत्तेत असताना राज्यातील एसटी MSRTC कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता, जवळपास तीन महिने हा संप चालला होता. यादरम्यान, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते, संप काळात १२४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचा संपकाळात मृत्यू झाला, आता त्यांच्या जागी वारसांना नोकरी देण्यात येणार या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कर्मचाऱ्यांच्या जागेवरती नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे या वारसांना सेवासलगतेचाही लाभ मिळणार आहे.