नाशिक- (Nashik) एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची खळबजनक घटना नाशिकमध्ये सामोरं आली आहे. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे.
याबाबत आत्महत्याचं कारण अद्याप सामोरं नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहेत. पण या खळबळजनक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये (radhakrushn nagar) एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं(He ended his life by hanging the fan in the room) वडील दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत.