पोलीस वृत्त ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क संवर्गात एकूण आठ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे.
सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, एमपीएससीच्या वतीने यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. उमेदवारांनी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार, या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल.
पहा कशी आहेत रिक्त पदे
सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – 70 पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग – सहायक कक्ष अधिकारी – 8 पदे
वित्त विभाग राज्य कर निरीक्षक – 159 पदे
गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक- 374 पदे
महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक श्रेणी – 1 / मुद्रांक निरीक्षक – 49 पदे
गृह विभाग – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – 6 पदे
वित्त विभाग – तांत्रिक सहायक – 1 पद
वित्त विभाग – कर सहायक – 468 पदे
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – 7034 पदे