जळगाव- (पोलीस वृत्त ऑनलाईन) परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उभी पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती येणारी पिके वाया गेल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. आणि ज्या शेतकन्यांची पिके या पावसाच्या फटक्यातून वाचले आहेत, त्या पिकांना योग्य दर मिळण्याची गरज आहे. बळीराजा शेतात कष्ट उपसून रात्रंदिवस काम करत आहे. परंतु सरकार मात्र कापसाला कवडीमोल भाव देऊन त्यांची प्रतारणा करीत आहेत. लहरी निसर्गानेही शेतकन्यांची हेळसांड केली असून अस्मानीसोबतच सुलतानी संकटाचा सामना ही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळवून देण्यासाठी शेतकन्यांसह जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.
ही न्याय में हक्कांसाठी लढाई आहे. शेतकरी आता पेटून आणार आहेत. सत्ताधारी य सरकार ने कितीही आवाज दडपण्याचा प्रयत्न केला तरी भारता चालणार नाही. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शेतकन्यांसाठी लढत राहू. कापसाला जास्तीत जास्त भाव मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतीत राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अतिवृष्टीने पिकाची पूर्णतः नासाडी झाली असून पेरलेली पिके काहीच हाती लागलेली नाही. शेतकरी
आर्थिकदृष्ट्या खंगून गेला असताना मदत देणे तर दूरच अद्याप शासनाने नुकसानीचे पंचनामे देखील केलेले नाही. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण न करता सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याबरोबरच त्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा.
येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभाव १५००० हजार देण्यात यावा अन्यथा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभर उग्र आंदोलन करण्यात यईल

