(पोलीस वृत्त-ऑनलाइन) नेपाळमध्ये आज मोठी विमान दुर्घटना झाली आहे. ७२ प्रवाशांचा समावेश असलेले विमान धावपट्टीवर कोसळून मोठा अपघात झाला आहे. पोखरा येथील यति एअरलाइन्सच्या विमान अपघातातील (In a plane crash) ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
काठमांडूहून पोखराकडे निघालेल्या यति एअरलाइन्सच्या 9N-ACNC फ्लाइटमध्ये 10 हून अधिक परदेशी प्रवासी असल्याचे समजते.
काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील(nepal-pokhara) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. दुर्घटना झालेल्या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले असून, विमानतळ सध्या बंद ठेवण्यात आले आहे. यातील ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू असल्याने मृतदेहांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (The police have expressed the possibility that the number of dead bodies will increase.) काठमांडूहून (kathamandu)पोखराकडे निघालेल्या N9-ANC ATR-72 विमानाला अपघात झाला. बचावकार्य अजूनही सुरूच आहे. विमानात (plane)चालक दलातील सदस्यांसह 72 प्रवासी होते.


