भारत देश युवा वर्गाचा जागतिक पातळीवर अग्रगण्य(Leading) असा देश आहे.आजघडीला युवा वर्ग प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देतोय.त्याच बरोबर देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात स्वताच अस्तित्व टिकवण्यासाठी तो अतोनात (great forcely) मेहनत घेतोय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवा वर्गचं खऱ्या अर्थाने झटतोय यास दुमत नसावे. कारण लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीस वाटते कि त्याने भविष्यात समाजात एक आदर्श म्हणून उदयास यावं.आणी भारतातील प्रत्येक युवा मग तो स्त्री असो वा पुरुष दोघेही स्वजीवनाचे कर्तेधर्ते( makers) म्हणून सतत झटतायात.
परंतु या सर्व गोष्टींत या धडपडणाऱ्या तरुणाईला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.आणी युवा वर्ग या समस्यांना त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच मानतात आणि मानायलाचं हव. कारण “मै न मानु जोरों को, दुनिया न माने कमजोरोंको |” अशीच आजची परिस्थिती.आणि आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक यांतील समस्या बऱ्याच अंशी रूढ झाल्यात, परंतु हल्लीच्या “युवांच्या” समस्याही “युवाच” आहेत. त्यातील १) स्वतःवरील नियंत्रण:- दिवसभरात अनेक घटनांचा योग जुळून सुध्दा आपल्या हाती काहीच लागत नाही किंवा खूप काही करुनही मनी समाधान मिळत नाही. याला स्वतःवरचा नियंत्रणाचा अभाव म्हणतात.आणि युवा वर्ग येथेच गडबडतोय,खाण्याच्या निवडीपासुन तर परिधानाच्या कपड्यांपर्यंत सर्वच तरुणाईत अतिरेक(excess) होत चाल्लयं.याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतोय.२) आत्मविश्वास:- आज देशात २२-२५ वर्षाचे ५६% तरुण नोकरीसाठी व उद्योगधंद्यांसाठी पात्र आहेत. तरीही युवा वर्गात उद्योग क्षेत्रात प्रवेशाची भीती बाळगतो. आपल्या तरुणाईत भरगोस कौशल्य आहे पण त्याचे यशात रूपांतर होतंच नाही कारण प्रत्येकवेळी युवांना डगमगायला आत्मविश्वासच भाग पाडतो.३) कुटुंबाची उभरत्यावेळीच सोडलेली साथ:- ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील प्रत्येक तरुण स्वःताच्या आयुष्याला आकार देण्यासाठी झटत असताना त्याला जन्मापासूनच कुटुंबाचा आधार असतो परंतु युवावस्थेत तो परिपक्व होते वेळीच कुटुंब गृहित धरते कि तो मार्गस्थ झालाय परंतु त्याला सगळ्यात महत्त्वाच आर्थिक पाठबळ ऐनवेळी दुरावतं आणी उभरता तरुण आर्थिक व मानसिक तणावामुळे व्यसनाधीन होत चाल्लाय म्हणून त्यांच्या उभरत्या काळात महत्वाच ते आर्थिक पाठबळ मिळायलाच हवं…!याच बरोबर रोजगाराचा मोठ्या प्रमाणात अभाव हि एक नवीन समस्या आजच्या युगात निर्माण झालेली आहे आणी संबंधित समस्येला तोंड देण्यासाठी तरुणांमध्ये एकी दिसुन येत नाही तसेच सरकारला जाब विचारुन याच निरसन (solution) होईल असा गट/संघ तरुणाईमध्ये सध्यातरी दिसुन येत नाही…! या सर्व “युवा” समस्या इथंच मरगळायला हव्यात तरच भविष्यात तरुणाईचं “चिरतारुण्य”(eternity) अबाधीत असेल.
वरील सर्व लिखीताचे निष्कर्ष हेच कि स्वहितासाठी झटणारी तरुणाई जेव्हा कणखर होईल…परिपक्व होईल…तेव्हाच खरी, ती राष्ट्राच्या कामी उपयोगी येऊन राष्ट्राचा भाग्योदय होईल…!
लेखक- ॲड. मंथन रामराव साळुंखे (मो.८९९९४४०१८५)


