अमळनेर : तालुक्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. अनेक लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे; पण त्यामुळे सरकारी रेशनच्या धान्याचा ग्रामस्थांना आधार मिळतो. सरकारी धान्य जर निकृष्ट दर्जाचेच येत असेल, तर सामान्य लोकांनी जगायचे कसे, हा खरा प्रश्न आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावात रेशन दुकानावर मोफत धान्यवाटप होत असताना त्या दुकानातील गव्हाच्या पोत्यात उंदराच्या लेंड्या, खडे, काळ्या तर मोजताना मोठ्या प्रमाणत त्यातून झिन उडत असते ऐवढेच नव्हे तर त्यात माचीस पेटीचा खाली खोका देखिल धान्याच्या गोणीत आढळून आला याबाबत रेशन ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला. रेशन दुकानदारास विचारले असता ते म्हणाले की, ‘ही धान्याची पोती काही आमच्याकडून भरली जात नाहीत. ती जिल्हा अन्नपुरवठा विभागाकडून पॅकिंग होऊन येत असतात. याबाबत अन्नपुरवठा विभागाला कळवण्यात येईल’. जिल्हा धान्य राशन अन्नपुरवठा विभाग व अन्नपुरवठा विभाग याकडे लक्ष देऊन लोकांना चांगल्या दर्जाचे धान्य द्यावे, अशी मागणी रेशन लाभार्थ्यांतून होत आहे.