अमळनेर: बोरी नदीपात्रात वाळू चोरांनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः हैदोस घातला असून नदीपात्रात दिवस रात्र चोरांनी वाळूचा उपसा करत बोरी नदी ओरबडली जात आहे. वाळू चोरीसाठी टोळ्या सक्रिय होत असून याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने चोरांचे मनोधैर्य वाढले आहे. दरम्यान मध्यरात्री धावणाऱ्या वाळू वाहतुकीच्या गाड्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
वाळू चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून रात्री उशिरापर्यंत उपसा सुरू असतो.
वाळू चोरीसाठी लहान तीन चाकी ॲपे गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. वाळू वाहतुकीसाठी अशा बिन नंबर प्लेट असणाऱ्या तीन चाकी वाहनांवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही अद्यापही अनेक तीन चाकी वाहने हे वाळूसाठी वापरले जातात ती वाहने गल्ली बोळातून सुसाट पळवले जातात अद्यापही प्रशासनाने वाढू वाहतूक अथवा अशा बेवारसपणे बिना नंबर असलेल्या तीन चाकीगाड्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही. अशा गाड्यांची संख्या आता तालुक्यात मोठ्या प्रमाणे वाढू लागली हे तीन चाकी वाहने येतात कुठून असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे आणि अनेक तरुण मुले अशी वाहने हाताशी घेत वाळू वाहतुकीच्या व्यवसायाला लागले आहेत मात्र या गोष्टीकडे प्रशासनाने मात्र पूर्णपणे डोळेझाक केले आहे.


