अमळनेर : रेल्वे स्थानकावर बुधवार सकाळी ९:२० वाजेचा सुमारास सुरत अहमदाबाद हावडा ही अमळनेर रेल्वे स्थानकावर प्रस्थान करताना प्रवासदरम्यान प्रकृती बिघडल्याने वृद्धाचा मृत्यू
सविस्तर वृत्त असे बुधवार रोजी सुरत- अहमदाबाद हावडा ही अमळनेरच्या दिशेने येत असताना ट्रेन नंबर 12833 डाऊन अहमदाबाद हावडा एक्सप्रेस प्रवासादरम्यान सकाळी ०८:४९ एका वृद्ध व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडल्याने याबाबत रेल्वे लाईन कॉल करून मदत मागितले असता. अहमदाबाद हावडा एक्सप्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर प्रस्थान वेळी अमळनेर रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. सदर वृद्ध पुरुष व्यक्तीस तातडीने रेल्वे डॉ. किरण बडगुजर यांनी तपासले असता डॉक्टरांनी सदर व्यक्तीच मृत घोषित केली. मयत व्यकीचे नाव कासमभाई करीमभाई जीवा वय- ७९ वर्ष राहणार डोंगरगड जि.राजनंदगाव , छत्तीसगड कोणत्यातरी दीर्घ आजाराने नैसर्गिकरित्या मयत झाला असावा याबाबतचा पुढील तपास लोहमार्ग पोलीस हेमंत ठाकूर करीत आहे.


