शेवगाव- (प्रतिनिधी: विकास शेलार) पोलीस स्टेशन शेवगाव येथे दिनांक २२ / १२ / २०२२ रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार बाबा शेळके, पोलीस अंमलदार धाकतोडे, राहुल खेडकर असे खाजगी वाहन क्र. MH -२३ AU- १९७५ इटिंगा गाडी या वाहनाने पोलीस स्टेशन शेवगाव येथील शेकटे ते लाडजळगाव रोडवर मुरमीचे शिवारात नाकाबंदी व कॉबींग ऑपरेशन करीत असतांना एक वाळूने भरलेले हायवा समोरुन येतांना दिसला त्यावेळी त्यास आम्ही नाकाबंदी करुन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालकाने जाणुन बुजून त्याचे ताब्यातील हायवा वाहन पोलीसांना जीवे ठार मारण्याचे उद्देश्याने अंगावर आणले त्यावेळी प्रसंगावधान राखुन तेथे ड्युटीवर असलेले पोलीस हे रोडचे बाजुला उड्या घेतल्या त्यामुळे सदर हायवा वाहन हे रोडचे बाजुला उभे असलेले पोलीसांनी आणलेले वाहन यास जोराने ठोस मारली त्यावेळी पोलीसांनी सदर वाहन चालकास त्याचे ताब्यातील वाहन उभे करणेबाबत इशारे करुन देखील सदर हायवा वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन तेथून घेऊन पळून गेला. त्यावेळी पोलीस स्टाफ सदर हायवा गाडीचा पाठलाग करीत असतांना हायवा गाडीचा पाठलाग करता येऊ नये यासाठी त्याचे काही साथीदार यांनी पोलीसांचे गाडीसमोर त्यांचे बोलेरो, स्कार्पिओ व काही मोटर सायकली आडव्या लावून जाणून बुजून हायवा वाहन व चालकास तेथून पळून जाणेस मदत केली.
गुह्याचे तपासात पळुन गेलेला हायवा याचा शोध पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब व त्यांचे टिमने केला व सदरचे वाहन हे आरोपीचे घरासमोर मिळुन आल्याने सदर वाहन जप्त करण्यात आलेले आहे. तसेच हायवा चालक किशोर पवार हा तेथून पळून गेला. हायवा वाहनाचा पाठलाग करतांना बोलेरो वाहन पोलीसांचे वाहनासमोर आणणारा १) हनुमान शहादेव पवार व त्याचा भाऊ २) बाळू शहादेव पवार रा.गुळज ता. गेवराई जि.बीड यास दि.२२/१२/२०२२ रोजी अटक करण्यात आलेली असुन गुन्ह्याचे तपासात अटक आरोपी यांना पोलीस कोठडी घेऊन तपास केला असता पोलीस कोठडीतील आरोपी यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी पोलीसांना त्यांचे कामात अडथळा निर्माण करणारा हनुमान पवार याचे सोबतच दुसरे वाहन काळ्या रंगाचे स्कार्पिओ हे त्याचा चालक ३) अमोल एकनाथ नाटकर वय ३५ वर्षे रा. राक्षसभुवन ता. गेवराई यास आज दिनांक २४/१२/२०२२ रोजी अटक केलेली असुन त्यांचेकडुन जप्त केलेली वाहने २७,००,०००/- रु. कि. ची हावया वाहन क्र. MH २३ AU १९७५ , १३,५०,०००/-रु.कि. ची बोलेरो वाहन क्र. MH-२१ BV-७९९७ ३) ३,००,०००/- रु. कि.ची स्कार्पिओ वाहन क्र. MH-२३ T १००७
असे एकुण ४३,५०,०००/- रु. कि. चे वाहने गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्ह्याचा तपास सपोनि व्हि.बी.पावरा हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अहमदनगर व अपर पोलीस अधीक्षक सो. प्रशांत खैरे साहेब, अहमदनर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप मिटके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.


