अमळनेर: तालुक्यातील दिव्यांग ५% निधी घोटाळा व अनियमितता करणारे ग्रा.सेवक ग्रा.पंचायतीची चौकशी करणेकामी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिकेत पाटील यांनी पारोळा येथील गटविकास अधिकारी श्री.विजय लोंढे यांची दि. २५/०७/२०२२ रोजी
मंगरूळ ग्रा.पं. ता.अमळनेर येथील विशेष चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सदर चौकशी प्रकरणी तक्रारदार योगेश पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न देता श्री.विजय लोंढे यांनी जाणूनबुजून हेतुपुरस्कर आर्थिक प्रलोभनापोटी आपल्या कर्तव्यात कसूर करून चौकशी न करता वरिष्ठांच्या तात्काळ आदेशाला केराची टोपली दाखवुन विलंब केला जात असल्याने मा. अपर मुख्य सचिव ग्रामपंचायत पंचायतराज मुंबई, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडेस अर्ज करून ७ दिवसाचे आदेश असतांना ११४ दिवस होऊनही चौकशी अहवाल सादर केला नाही अश्या पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यावर शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करावी व वार्षिक गोपनीय अहवालात तशी नोंद घेणेबाबत योगेश पवार यांनी तक्रार केली आहे.



