चोपडा प्रतिनिधी: रविंद्र कोळी तालुक्यातील लासूर येथील वनपाल यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन रेंज स्टाफ चोपडा यांच्यासह कक्ष क्रमांक 260 या भागात रात्री – अपरात्री अवैधरित्या दोन झोपड्या नव्याने तयार केलेल्या दिसून आल्यात सदर झोपड्या ह्या स्टाफच्या मदतीने पूर्णपणे नष्ट करून झोपड्यांना वापरलेला इंजयाली माल नग 15 जळाऊ घनमिटर 0.50 जप्त करून मुद्देमाल हा शासकीय वाहनाने मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा करण्यात आला.सदर कार्यवाहीत प्रशांत सोनवणे वनपाल लासूर व उमर्टी,वनरक्षक एस.के.कंखरे,सुनील भोई,संदीप पावरा,सरला भोई ,सोनाली बारेल उज्वला बारेला,रिला पावरा वाहन चालक गोविंदा चौधरी व मदन मराठे, शशीकांत बोरसे,अशोक, सुखदेव, बाविस्कर,दिलीप,योगेश,ऋषिकेश,विशाल,संभाजी राजपूत यांनी सहभाग घेतला.सदर कार्यवाही ही विवेक होशिंग सर वनसंरक्षक धुळे प्रादेशिक,संजय पाटील विभागीय वन अधिकारी(दक्षता)धुळे,प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा, व बी. के.थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रादेशिक व वनक्षेत्रपाल चोपडा प्रा,यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात येते की,वन व वन्यजीव तसेच अवैध वृक्षतोड अतिक्रमण व अवैध लाकूड वाहतूक संबधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा ही विनंती.


