अमळनेर : येथील रेल्वे स्थानकावर चहा पिण्यासाठी आलेल्या तरूणावर एका चोरट्याचे प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकावर २० रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास सचिन फकिरा पाटील रा. शिवशक्ती चौक, तांबेपूरा, राहुल रघुनाथ पाटील रा. सानेनगर व तुषार सोनार हे चहा पिण्यासाठी आले होते. त्याचवेळी हातात काठी घेतलेले दोन तरुण आले व त्यांनी सचिनच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. सचिनने त्यांना प्रतीविरोध केला असता दोघांपैकी एकाने चाकू काढून त्याच्या बोटांवर, मानेवर, कमरेवर, छातीच्या खाली चाकूने सपासप वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्याने भांबावलेल्या सचिनने मदतीसाठी धावा केला असता हल्लेखोर चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.
दरम्यान, चाकुने वार करणारा रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील रा. बंगाली फाईल हा असल्याचे समजले. याप्रकरणी रेल्वे पोलिसात जबरी लूट करून हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


