जळगाव: संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. अशा या थोर कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेच्या पूजाऱ्याची आज पुण्यतिथी. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
आज संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त माल्यार्पण करताना महापौर जयश्री महाजन न.से गणेश सोनवणे,
उपायुक्त आस्थापना चंद्रकांत वानखेडे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे,
कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, शाखा अभियंता मनीष अमृतकर, अशोक भारुडे सुरेश कोल्हे
वासुदेव सोनवणे, सुरेश ठाकरे मा .न.से चेतन शिरसाळे सर्जेराव बेडीसकर, अरुण राऊत, राकेश वाघ दीपक बाविस्कर, शंकर निंबाळकर, संदीप सोनवणे भूषण सोनवणे, रमेश सूर्यवंशी मनपा कर्मचाऱ्यांसह व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.