समाज घडविण्यासाठी संवेदनशील समाजाची जडणघडण, निर्मिती होणे आवश्यक आहे; परंतु शिक्षण क्षेत्रातून ती होताना दिसत नाही. संस्कारीत पिढी निर्माण करण्यासाठी पूर्वप्राथमिक शिक्षणाचा ढाचा मजबूत करण्याची गरज आहे, असे मत शिक्षणक्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. मुलांवर इयत्ता पहिली ते चौथी दरम्यान खूप संस्कार होणे गरजेचे असते परंतु याच शिक्षणात विद्यार्थी मागे राहतात त्यामुळे पुढील शिक्षणात विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडते. प्राथमिक शिक्षणाचा ढाचा मजबूत नसल्याने शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

असाच एक प्रकार जि.प शाळा त्यातून ४ थी पास होऊन हायस्कूल ला ५ वीतल्या वर्गात गेलेला विद्यार्थी त्याला साधी बेरीज वजाबाकी करू शकत नाही, मराठी वाचता येत नाही. अन हायस्कूल ला १० वी च्या वर्गात शिकणारा विद्यार्थाला इंग्रजी वाचता येत नाही. अशी बिकट परीस्थिती या जी.प शाळेतून पुढे निघणाऱ्या विद्यार्थ्यांची होत आहे
मात्र पुढे पाचवीच्या वर्गात जाऊन हायस्कूलमध्ये देखील तीच परिस्थिती थेट दहावीपर्यंत जात फक्त त्याची मराठी मातृभाषा सावरली जात आहे. पण मात्र इंग्रजी भाषेचे त्याला अद्यापही ज्ञान पूर्णत्वास प्राप्त होत नाही. या मुलांना लेखन वाचन येत नाही. मग निपुण भारत मोहिमेचे पुढे काय होते. हा प्रश्न विचारायला नको. असे मोजके विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजी वाचता येते पण इंग्रजी भाषेत संवाद साधने इंग्रजी बोलणे हे तर अवघडच मात्र अशा संस्थांतील शिक्षक काय करतात? दिवसभर फक्त चहापाणी आणि आरामाची नोकरी शाळेत वेळेवर पोहोचतात का? शाळा केवळ टाईमपासचे साधन झाले आहे का? विद्यार्थ्यांना शिकवतात का सिल्याबस किती पर्यंत पोचले शिक्षकाला शाळेत यायला उशीर आणि लवकर जाण्यासाठी घाई असते. राजकीय पुढार्यांना हाजी हाजी करणारी ही शाळा कोणती हे देखील पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यात ऱ्हास फक्त विद्यार्थ्यांचा बौद्धीचाच होत आहे. असा अजब गजब कारभार हा शाळेत सुरू आहे. या अध्यपथनाला थांबवणार कोण हा खरा प्रश्न निर्माण होतो. पण समाजामध्ये राहून देखील हे सगळं पाहत नाही म्हणून लिहावसं वाटलं. पटलं तर विचार करा आणि याच्यावर काहीतरी उपाय करता येईल का? यावर चिंतन करा.
संपादक: रजनीकांत पाटील

