अमळनेर : २६ नोव्हेबर संविधान दिन साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिनानिमित्त अमळनेर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करत पुष्पहार अर्पण केले. विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या जयघोष करत शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे तसेच डॉ मोहनलालजी पाटील राष्ट्रीय महासचिव यांच्या आदेशान्वये त्याचप्रमाणे मा बाळासाहेब पवार महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भाऊ दरोडे आणि माननीय दीपक भाऊ सपकाळे जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार माननीय समाज भूषण यशवंत बैसाणे जळगाव जिल्हा महासचिव त्याचप्रमाणे पितांबर वाघ तालुका अध्यक्ष एडवोकेट अभिजीत बिऱ्हाडे शहराध्यक्षतसेच युवा तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे युवा तालुका उपाध्यक्ष विनोद बिऱ्हाडे, जेष्ठ नेते अरुण घोलप सर, लोक संघर्ष मोर्चा विभागीय संघटक, आदिवासी पारधी विकास परिषद खान्देश प्रांत अध्यक्ष,माननीय मुन्नाभाई बैसाणे ब्लू टायगर सामाजिक संघटना माजी अध्यक्ष,अजय मोरे युवा शहराध्यक्ष,शिवा सैंदाणे,दयाराम ठाकरे रिपब्लिकन एकलव्य सेना,उत्तम नगराडे, तानाजी वाघ,अमृत मैराळे, अक्षय बच्छाव, अजय गव्हाणे, रावसाहेब पारधी, आबा गव्हाणे, राहुल वाडेकर, घनश्याम भाऊ घोलप, अण्णा मघाडे, राजूभाऊ, संजय मैराळे, निलेश बाविस्कर,विश्राम मोरे, अनिल बनसोडे सह आदी नागरिकांची उपस्थिती होती.

