• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

प्रांत रजेवर, प्रभारींना सह्यांचा अधिकारच नसल्याने दाखल्यांसाठी मुलांची फरफट

policevrutta by policevrutta
November 28, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, शैक्षणिक
0
प्रांत रजेवर, प्रभारींना सह्यांचा अधिकारच नसल्याने दाखल्यांसाठी मुलांची फरफट
0
SHARES
402
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तब्बल १०१० जातीचे दाखले प्रलंबित, मुलांच्या या नुकसानीला जबाबदार कोण?

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पेटवली मशाल

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रांताधिकारी रजेवर गेल्याने आणि प्रभारी प्रांताधिकाऱ्यांकडे सह्यांचा अधिकार नसल्याने निवडणुका,शाळा, कॉलेज आणि पोलिस, सैन्य भरतीसाठी लागणाऱ्या आवश्यक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. हे विद्यार्थ्याचे हाल थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करीत दाखले त्वरित मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. यावर तातडीने तोडगा न काढल्या गेल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात आज पर्यंत तब्बल १०१० जातीचे दाखले प्रलंबित, मुलांच्या या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात अमळनेर आणि चोपडा तालुक्याचा समावेश आहे.
प्रांताधिकारी सीमा अहिरे या रजेवर आहेत. तर त्यांचा प्रभारी पदभार हा जळगाव येथील अधिकाऱ्यांना दिला आहे. परंतु त्यांना नुसताच पदभार असल्याने ते कशावरही सह्या करू शकत नाही. मात्र दुसरीकडे सध्या शासनाकडून पोलिस भरती तसेच शाळा, कॉलेजांचे प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना लागणारे नॉन क्रिमिलीयर, डोमोसिल, जात प्रमाणपत्र आदी दाखले आवश्यक आहे. प्रांत कार्यालयात हे दाखल्यांचे प्रस्ताव येऊन पडले आहेत. परंतु प्रांताधिकारी अहिरे या रजेवर असून पदभार घेतलेल्या अधिकाऱ्याला सह्यांचा अधिकार नसल्याने या दाखल्यांचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. विद्यार्थ्यांचे हे होणारे हाल पाहून उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रांत कार्यालय गाठून दाखले देण्याची मागणी केली. हे दाखल देण्याची त्वरित प्रक्रिया न राबवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील,तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, शहर प्रमुख सुरज परदेशी, विधानक्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, शहर संघटक मोहन भोई, उपतालुका प्रमुख चंद्रशेखर भावसार ,बाबू परब,देवेंद्र देशमुख, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, जिवन पवार, उमेश अंधारे,अखतर तेली, यांनी दिला आहे.

पोलिस भरतीसाठी अडचण

राज्य शासनाने पोलिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची मुदत ही ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलीयर, डोमोसिल, जात प्रमाणपत्र नसल्याने अर्ज करण्यास अडचण आहे. त्यामुळे त्यांना या पोलिस भरतीपासून वंचित राहावे लागेल. मैदानी आणि लेखी तयारी करूनही केवळ शासकीय गोंधळामुळे आपल्याला भरतीपासून वंचित राहावे, लागणार असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे,तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील आहेत अर्ज स्विकारणे सुरू असल्याने याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन मार्ग काढत विद्यार्थ्यांना दाखले द्यावेत, अशी मागणी होत आहे.

Previous Post

संविधान दिनी रिपाईच्या वतीने शहरात भव्य मोटार सायकल रॅली…

Next Post

साने गुरुजी विद्यालयात वाचक वीर स्पर्धा संपन्न

policevrutta

policevrutta

Next Post
साने गुरुजी विद्यालयात वाचक वीर स्पर्धा संपन्न

साने गुरुजी विद्यालयात वाचक वीर स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!