केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तक्रार करण्यासाठी तक्रार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे यापुढे आपल्याला फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत तक्रार करता येणार आहे – पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करणार आहे.
काय सांगितले केंद्र सरकारने
केंद्र सरकारने शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे
या तक्रार समितीमध्ये एक अध्यक्ष आणि केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले दोन सदस्य असतील. दोन सदस्य पूर्णवेळ कार्यरत असतील.
सुधारित नियमांनुसार, टेक कंपन्यांना 24 तासांच्या आत युजर्सच्या तक्रारी स्वीकाराव्या लागतील. माहिती, पोस्ट किंवा सूचना काढून टाकण्याची विनंती केल्यास ते 72 तासांत कंपनीला ही समस्या सोडवावी लागेल – अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

