यंदाची दिवाळी ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याची स्थिती आहे. कारण डाळवर्गीय खाद्यपदार्थांच्या दरात सध्या मोठी वाढ होताना दिसत आहे, यामध्ये तूर, मूग, उडीद इत्यादींचे भाव वाढलेले आहे.

सध्या ठोक बाजारात डाळींचे भाव ११० रुपये प्रति किलो झाले असून किरकोळ बाजारात १३० पर्यंत दर पोहचले आहेत
*पहा काय आहे कारण ?
डाळींच्या भाववाढीला निसर्गाची झालेली अवकृपा कारणीभूत ठरली असून यंदा ऐन हंगामात अतिवृष्टीचा फटका डाळवर्गीय पिकांना बसला आहे.
यामध्ये तूर, उडीद, मुगाचे पीक अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाले आहे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाल्याने याचा थेट परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे

