हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘नूरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्यामुळे नैऋत्य माॅन्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे..

या सुपर चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडू शकतो – असे पंजाबराव डख यांनी सांगितले
आणखी काय सांगितले हवामान विभागाने ?
राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग –
तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
तर ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस होतील, दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.
केव्हा सुरु होणार परतीचा पाऊस ? – राज्यात परतीच्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. वायव्य राजस्थान, गुजरातमधील कच्छमधून माॅन्सून परतला आहे.
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातूनही माॅन्सून माघारी फिरणार आहे. 8 ऑक्टोबरला मुंबईतून माॅन्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
तर राज्यात 28 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

