जळगाव: शहरातील एक धक्कादाय घटना समोर आले आहे शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची खळबजनक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा आपल्या पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह करत होता. सायंकाळी साडेसहा वाजता पती पत्नित वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. घटनास्थळी तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे दाखल झाले होते व पुढील तपास करीत आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

