मुंबई: पत्नी घटस्फोट न दिल्याचा राग अनावर झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीने धार धार शस्त्राने आपल्या पत्नीचीच हत्या केली. धक्कादायक घटना टिळकनगर परिसरात घडली आहे.

या घटनेत 20 वर्षीय जारा इक्बाल शेख हिचा मृत्यू झाला असून टिळक नगर पोलिसांनी पती इकबाल मोहम्मम शेख (37) याला अटक केली आहे. चेंबूरच्या राहुलनगर प्रगती चाळ येथेही घटना घडली मगील काही दिवसापासून वाद होते.
याच वादातून पती इक्बालने आपल्या पत्नी जाराला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मात्र जाराचा नकार नसल्याने दरम्यान 26 सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारासा याच कारणांवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या इक्बालने धारदार सुऱ्याने पत्नीवर वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 302, भादवि सह 37 (1) (अ), 135 महाराष्ट्र पोलिस अधि. 1951 नुसार गुन्हा दाखल करून इक्बालला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इकबाल आणि रूपाली यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरधर्मीय प्रेम विवाह केला होता. रुपालीच्या कुटुंबाचा याला विरोध असल्याने त्यांनी पळून जावून लग्न केले. त्यांना दोन वर्षांचा मुलागा आहे. लग्नानंतर आंतरधर्मीय असल्याने रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. तिला बुरखा पद्धती आवडत नव्हती. मात्र वारंवार इकबाल आणि त्याचे कुटुंबिय याबाबत तिच्यावर दबाव टाकत होते. यावरून त्या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ते विभक्त झाले होते.
रुपाली तिच्या मुलासह मैत्रिणीकडे राहत होती. सोमवारी संध्याकाळी इकबाल याने रूपालीला भेटण्यासाठी चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे बोलावले. रूपाली तिथे गेली असता इकबालने तिच्यावर चाकूने वार करून पळून गेला.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रूपालीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली असता टिळक नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयीत आरोपी इकबालला अटक केली आहे.

