केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील अप्रत्याशित कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला माहिती असेल, काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 97.40 डाॅलरवर गेली होती. मात्र, या महिन्यात ही किंमत प्रति बॅरल 92.67 डाॅलरवर आली आहे
दरम्यान आता केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील कर 13,300 रुपये प्रति टनावरून 10,500 रुपये केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, डिझेलवरील निर्यात शुल्क 13.5 रुपयांवरुन 10 रुपये प्रति लिटर केले आहे.
याचबरोबर विमानातील इंधनावरील निर्यात शुल्क 9 रुपयांवरुन 5 रुपये प्रति लिटर केले आहे – तर नवीन दर आजपासून लागू होतील – असेही केंद्र सरकारने म्हटले आहे

