सध्या परतीच्या वाटेवर निघालेला माॅन्सून कोकण, घाट परिसरात सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील.

यामध्ये विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
कशी असणार पुढील हवामान स्थिती ?
१५ सप्टेंबरला – मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, तर रत्नागिरी व सिंधुदुर्गात जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे
१६ सप्टेंबरला– पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सरासरी पावसाची शक्यता आहे तर
१७ सप्टेंबरला– रायगड आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील – असे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले

