अमळनेर:- शहरातील परमिटरूम व बिअरबार हॉटेल फोडून सुमारे ५४ हजार २२५ रुपयांचा देशी विदेशी दारू आणि रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला घडला. अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील हॉटेल भगवती परमिटरूम व बियरबार हे दुकान मंगेश पाटील रा. ओमकार नगर यांच्या मालकीचे आहे. १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मंगेश पाटील यांनी दुकान बंद करून घरी गेले असता. दरम्यान अज्ञात चोरट्याने परमिटरूम व बिअरबारचे दुकान फोडून दुकानातील देशी-विदेशी दारू रोकड आणि इलेक्ट्रिक सामान असा एकूण ५४ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आला. मंगेश पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील करीत आहे.

