जळगाव: दि.१२ डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या विज्ञान मंडळातर्फे “अंतराळ प्रवास “या विषयावर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य श्रीमती सुनिता पाटील यांनी भूषविले. समन्वयक प्रा. के.सी.वंजारी कार्यक्रमास उपस्थित होते. याप्रसंगी ,प्रमुख वक्ते श्री सतीश पाटील यांनी वेगवेगळ्या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्य, चंद्र ,तारे- ग्रह यांच्या स्लाइड्स दाखवून प्रत्येक ग्रहांची माहिती दिली. आकाशगंगेचे समूह दुर्बिणीद्वारे बघता येतात , वेळ आणि वेग ही संकल्पना अंतराळात शून्य असते हे देखील त्यांनी स्पष्ट केले सूर्या वरील सन स्पॉट कसे दिसतात ते त्यांनी स्लाइड्सद्वारे विद्यार्थिनींना दाखविले .वेगवेगळ्या टेलिस्कोप ची माहिती दिली. विविध प्रकार व आकाराच्या दुर्मिळ दुर्बिणींची ओळख करून दिली . मंगळ या ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही हे सुद्धा सरांनी सरळ व साध्या शब्दात सांगितले .त्याचप्रमाणे त्यानी संशोधनात्मक दृष्टिकोन प्रेरित केला. विशेष करून खगोलशास्त्राच्या करिअर विषयी माहिती दिली .
या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. वीणा चौधरी यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रा.श्रीमती धनश्री महाजन आणि आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती सुजाता महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.


