मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी: मुक्ताईनगर तालुक्यातील प्रिप्री पंचम हद्दीतील सोनबर्डी कंपार्टमेंट नंबर (५४३) या ठिकाणी मध्य प्रदेश शहापूरचे 35 ते 40 मेंढपाळ व्यवसायिकांनी आपल्या जनवारासह ठिय्य
मांडला आहे, मध्यप्रदेशवनविभागानेमेंढपाळांवर कारवाईचा सपाटा सुरू केल्यामुळे हे संपूर्ण व्यावसायिक मेंढपाळ महाराष्ट्रातील वडोदा वनपरिक्षेत्रातील अधिकारी यांच्याशी मेंढपाळ व्यवसायिकांनी संपर्क करून व आर्थिक देवाण-घेवाण करून त्यांनी महाराष्ट्रात आपले मेंढपाळांना चराईसाठी सोनबर्डीवर ताबा केला आहे
महाराष्ट्रातील वडोदा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारीयानी अर्थपूर्ण व्यवहारामुळे त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही वरिष्ठ सुद्धा याच्या मध्ये सामील झालेले असल्याचे समजते? अशा स्वरूपाची बातमी J B N न्यूज व K T V न्यूज , दैनिक जळगांव वृत यामध्ये बातम्या प्रसिद्ध होताच वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन त्यांनी वडोदा वन क्षेत्रपाल सचिन ठाकरे यांना आदेश करून संबंधित मेंढपाळांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचे आदेश देऊन त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेले आहे,
परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कारवाई करण्यात आली नाही
कारण वडोदा वनक्षेत्रपाल यांचे आर्थिक संबंध व इतर संबंध मेंढपाळ व्यवसायिकांनशी असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित मेंढपाळां च्या चौकशीसाठी जात असताना त्यांना फोनवरून माहिती देऊन तुम्ही त्या ठिकाणी थांबू नका त्या ठिकाणी आम्ही आल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल याला आपण जबाबदार राहणार नंतर आमच्याशी बोलायचं नाही अशा प्रकारचे त्यांनी त्यांना मेसेज पाठवून त्या ठिकाणी त्यांनी मध्य प्रदेशाच्या हद्दीतबसा आम्हाला दिसू नका अशा प्रकारची माहिती देऊन त्यांना त्या ठिकाणी हलवण्यात आले नंतर त्या ठिकाणी कर्मचारी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर वरिष्ठांना अहवाल व माहिती देताना या ठिकाणी आम्ही गेलो असता या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे मेंढपाल व व्यावसायिक नागरिक या ठिकाणी नाही हे मध्य प्रदेशामध्ये च्या हद्दीमध्ये आहेत आपल्या हद्दीमध्ये नाहीत अशा प्रकारची माहिती संबंधित वनपाल वनरक्षक वनमजूर या टीमने वरिष्ठांची दिशाभूल करून अशा प्रकारची माहिती देऊन त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये जाणून-बुजून कसूर केल्याचे समजते अशा भ्रष्ट व कर्तव्य पालन करत नसलेल्या कर्मचाऱ्यांवरती वरिष्ठ पातळीवरून त्याची चौकशी करून यांच्यावर कायदेशीरस्वरूपाची कारवाई करण्यात यावी याच प्रिप्री पंचम हद्दीत मागील काही दिवसांमध्ये अवैध्य गौण खनिज संदर्भामध्ये एका वनरक्षकावर कर्मचाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई करण्यात आली होती त्याला या प्रिप्रीपचम हद्दीत कर्तव्याचे पालन केले नाही म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं मग हा प्रकार एवढा असताना सुद्धा यांच्यावर कारवाई करण्यात का नाही आली
या आर्थिकव्यवहारामुळे देवाण-घेवांमुळे या मेंढपाळांना वडोदावनक्षेत्रातील वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक व वनमजूर या सर्व लोकांनी मेंढपाळांना पाठीशी घालत आहे पण त्यांचे संरक्षण करत आहे कायद्याचे पालन केल्या जात नाहीहे या घटनेवरून स्पष्ट होत आहे
वन विभाग हे राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मध्ये असलेला विभाग आहे आणि यांना त्या ठिकाणी चौकशी केली असताना त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर जर का मध्य प्रदेशांतीलवनविभागामध्येमेंढपाळ दिसत असताना यांना सुद्धा कारवाई करण्याचे अधिकार आहेत यांनी तात्काळ त्या संबंधित विभागाला कळविणे त्यांची जबाबदारी होती ते त्यांनी केले नाही दुसरी बाजू त्यांच्या ताब्यात ह्या मेंढ्या देण्यात का आल्या नाही व त्यांना फोन का केला गेला नाही की आपल्या हद्दीमध्ये अशा प्रकारचा मेंढपाळ चराई करत आहे आपण या ठिकाणी येऊन त्यांना ताब्यात घेण्यात याव्या अशा प्रकारची यांच्याकडून मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी असताना सुद्धा यांनी त्याच्यामध्ये कसूर केल्याचं स्पष्टपणे निष्पन्न झालेले आहे यावरून स्पष्ट होते की यांचे मेंढपाळांसोबत आर्थिक व्यवहार देवाणघेवाण हितसंबंध खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यांनी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर आपल्या पदाचा दुर उपयोग केला गेलेला आहे यावरून सिद्ध होत आहे
कर्तव्यावर असलेले वनपाल वनरक्षक वनमजूर या कर्तव्यात यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले म्हणून त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई करण्याची गरज आहे कारवाई केली गेली नाही तर हा प्रकार व कायद्याचा वचक या मेंढपाळांवर व कर्मचाऱ्यांवर राहणार नाही तर वनप्रेमींचा व नागरिकांचा वनविभागावरील संपूर्ण विश्वास उडून जाईल आणि नंतर वडोदा वनक्षेत्राचं वाळवंट होण्याला काहीच वेळ लागणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरून कर्तव्यदक्ष असलेले वन उप सरक्षक जळगाव व धुळे विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांनी दाखल घ्यावी अशी वन प्रेमिंची. मागणी आहे,