जळगाव (पोलीस वृत्त)काल मंगळवारपासून रात्री औरंगाबाद येथील एका यूट्यूब चैनल वरून जळगाव मे मुस्लिम लडकी के साथ हुआ गॅंग रेप या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली सदर बातमीची शहनिशा करण्यासाठी जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी तोंडापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, पीडिताच्या घरील सदस्या सोबत तसेच घाटी येथील उपस्थित नातेवाईक व औरंगाबाद तेथील ह्युमन राइट्स वाल्यांसोबत चर्चा केली.
बुधवारी सकाळी घेतली भेट
आज सकाळी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सदर घटनेबाबत त्वरित चौकशी होऊन जर तसा प्रकार घडला असेल तर आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा सदरचे वृत्त हे खोटे असल्यास तसे पोलीस प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्वरित प्रसिद्ध करावे अशी मागणी केली असता माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी त्यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्यात येईल असे मुस्लिम शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सैयद चाँद,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मजहर खान ,जळगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष नदीम काझी,ह्यूमन राईट फोरम जळगावचे अन्वर खान, सामाजिक कार्यकर्ते शौकत पेंटर व प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव बाबा देशमुख यांचा समावेश होता.
पोलीस आधीक्षकांचे त्वरित आवाहन
पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी निवेदनाची दखल घेत त्वरित व्हीडिओ क्लिप च्या माध्यमाने वस्तुस्थिती विशद केलेली आहे व अद्याप तपासात गॅंग रेप चा संबंध नसून रानडुकरे अथवा मानवी मारहाणीचा प्रकार दिसून येत असून तपास सुरू आहे तो पर्यंत अफवा पसरू नये असे आव्हान केले आहे
१) माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांना निवेदन देताना फारुख शेख सोबत नदीम काझी, मजहर खान, सय्यद चांद, शौकात पेंटर आदि दिसत आहे
२) पोलीस अधीक्षक सोबत चर्चा करताना
३) मा पोलीस अधीक्षक यांचे आव्हान ची क्लिप

