नाशिक:- उंटवाडी येथे आईस्क्रिम घेण्यासाठी वडिलांसमवेत दुकानात गेलेल्या चिमुरडीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाला. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी (४, रा. सुखशांती बंगलो, जगताप नगर, मातोश्री चौक, उंटवाडी) असे चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास विशाल कुलकर्णी हे त्यांच्या चार वर्षांची मुलगी ग्रीष्मा हिला आईस्क्रिम घेण्यासाठी घराबाहेर पडले. राहत्या घराजवळच असलेल्या प्रसन्न सोनार यांच्या मेडिकल दुकानात ते आईस्क्रिम घेण्यासाठी गेले. त्यावेळी दुकानातील फ्रिजच्या वायरचा शॉक ग्रीष्मा हिला बसला आणि ती जागेवरच बेशुद्ध पडली.
त्यावेळी उपचारासाठी विशाल कुलकर्णी यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव धुम यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत. चिमुरडीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककाळा पसरली

