रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता कन्फर्म रेल्वे तिकिट रद्द करणे अधिक महाग होणार आहे. कारण, रद्द केलेल्या तिकिट शुल्कावर आता वस्तू व सेवा कर.अर्थात ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे.

कीती लागणार GST ?
रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी ‘कन्फर्म’ तिकीट रद्द केल्यास, एसी फर्स्ट क्लासवर 240 रुपये, एसी टियर-2 वर 200 रुपये, एसी टियर-3 व चेअर कारसाठी 180 रुपये तसेच स्लीपर क्लासवर 120, तर द्वितीय श्रेणीच्या तिकिटांवर 60 रुपये तिकीट रद्द केल्याबद्दल शुल्क आकारले जाते.
याव्यतिरिक्त ट्रेन सुटल्यानंतर 12 तासांत तिकीट रद्द केल्यास 25 टक्के तिकीट भाडे आकारले जाते. कन्फर्म तिकीट ट्रेन सुटल्यानंतर 4 तासांत रद्द केल्यास, भाड्याच्या 50 टक्के ‘कॅन्सलेशन चार्ज’ आकारला जातो.
तर प्रथम श्रेणी, एसी डब्याच्या तिकिटांच्या बुकिंगवर 5 टक्के ‘जीएसटी’ कर आकारला जातो

