राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पुढील दोन दिवस मेघगर्जना, सोसाट्याचा वारा तसेच विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर होण्याचीही शक्यता आह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात दोन दिवस काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दक्षिण तमिळनाडूपासून मध्य प्रदेशापर्यंत द्रोणीय स्थिती असून, ही स्थिती कर्नाटक, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा पार करून पुढे गेली आहे. या स्थितीमुळेच राज्यात पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हा पाऊस अजून दोन दिवस राहील.
या तारखांना यलो अलर्ट :
रायगड- १,२, रत्नागिरी-१,२,सिंधुदुर्ग- १,२,, नाशिक – १, नगर- १,२, पुणे- १,२, कोल्हापूर- १,२,सातारा- १,२, सांगली- १,२,सोलापूर- १, औरंगाबाद- १, बीड- १, उस्मानाबाद- १, बुलडाणा- १, चंद्रपूर-१, गडचिरोली- १, गोंदिया- १, वर्धा- १

