अनेकांना पाळीव प्राण्यांविषयी ममत्व असतं. ज्यांना घरात प्राणी पाळणं शक्य आहे, असे लोक स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात. त्यानं फिरावन- हिरावन त्यांनी हौस मौस पूर्ण करण त्यांनी काळजी त्यांची आंघोळ पाणी निगा राखण त्यांचे वाढदिवस साजरे करणं, त्यांना परिवारातील एखादा सदस्य प्रमाणे प्रेम केलं जातं वागणूक केली जाते त्यांच्यासाठी विशेष खोली ठेवणं इत्यादी गोष्टीही केल्या जातात.
पण, गुजरातमध्ये असं एक गाव आहे, जिथे कुत्रे कोट्यधीश आहेत.

गुजरात येथील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर तालुक्यात कुशकल नावाचं गाव आहे. येथील रस्त्यावरील कुत्रे देखील कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या नावे कोटींची संपत्ती आहे. ही बातमी खोटी वाटली तरी खरी आहे. कुशकल या गावाची लोकसंख्या 7 हजार आहे. हे गाव आर्थिकदृष्ट्याही संपन्न आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन हे आहेत. या गावातील ग्रामस्थांसोबत येथील कुत्रे देखील आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत. येथील कुत्र्यांच्या नावे 20 गुंठे जमीन आहे. या जमिनीची किंमत 5 कोटी रुपयांहून अधिक आहे.
यामागे या गावचा इतिहास आहे. या गावात पूर्वी नवाबांचं राज्य होतं. नवाबांनी ग्रामस्थांना 20 गुंठे जमीन कसण्यासाठी दिली होती. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत येथील ग्रामस्थांनी कुत्र्यांच्या नावे ही जमीन केली.

