सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लग्नाच्या तयारीत असलेला आणि नटून थटून तयार झालेला नवरदेव अचानक तिथून पळ काढत असल्याचं दिसतं. तर त्याची होणारी नवरी (Bride) ही त्याचा धावा करत आहे आणि आपल्याशी लग्न करावं म्हणून त्याच्या हातापाया पडत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र त्यापैकी बरेचसे व्हिडिओ हे मनोरंजनासाठी तयार केलेले असतात. हा व्हिडिओ मात्र खरा असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही सत्यघटना असून कोर्ट मॅरेजसाठी आलेल्या नवरदेवाने अचानक आपला विचार बदलला आणि लग्नकार्यातून काढता पाय घेत धूम ठोकणंच पसंत केलं.

व्हिडिओ बिहारच्या नवादा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. इथल्या महुली गावातील राम अवतार चौहानी यांची कन्या गुड्डी कुमारी हिचं लग्न महकार नावाच्या गावातील संदीप कुमार या तरुणाशी होणार होतं. दोघंही एकमेकांशी फोनवरून गप्पा मारत असत आणि एकमेकांशी लग्न करण्याचा विचार त्यानी पक्का केला होता. एक दिवस संदीप कुमार हा गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला. त्यावेळी गावातील सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी दोघांचं लग्न लावून द्यायचं नक्की केलं. संदीप कुमार असं अचानक लग्न करायला तयार नव्हता. मात्र गावकऱ्यांचा एकंदरित नूर आणि आक्रमकपणा पाहून त्याने लग्न करायला होकार दिला.
लग्न करायचं नक्की झाल्यानंतर गावकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं जाऊन नावनोंदणी करावी आणि तिथेच एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालती जावी, असा गावकऱ्यांचा बेत होता. मनाविरुद्ध लग्नाला तयार झालेला संदीप कुमार हा तरुण आपली या कचाट्यातून कशी सुटका करून घेता येईल, या विवंचनेत होता. सगळी वऱ्हाडी मंडळी एकत्र जमली आणि संदीपला घेऊन कोर्टाकडे रवाना झाली. (All the grooms gathered together and left for the court with Sandeep)
कोर्टाच्या परिसरात गाड्या थांबल्या आणि सगळे पायऱ्या चढून वर जाऊ लागले.
हीच संधी साधत संदीपने आपली सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला. यापेक्षा अधिक वेळ जर आपण दवडला तर विवाहबंधनात आपल्याला अडकावेच लागेल, हे त्याने बरोबर ताडले आणि योग्य संधी साधत तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूला कमीत कमी लोक असल्याची वेळ साधत त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या होणाऱ्या नवरीने त्याला अडवले आणि आपल्याशी लग्न न करता पळून जाऊ नये, अशी विनंती केली. तिच्यासोबत असणाऱ्या आणखी एका व्यक्तीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशी संधी दवडून तिथंच थांबेल, तो संदीप कसला? त्याने नवरीचं म्हणणं ऐकूनही न घेता तिथून जिवाच्या आकांताने धूम ठोकली.(Without even listening to what his wife said, he rushed from there.)
सर्व शक्ती पणाला लावून तो धावत सुटला आणि रस्त्यावरचा डिव्हायडर ओलांडून गर्दीत गायब झाला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
(Currently, this video is going viral on social media)
