जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. आज सकाळी मुक्ताईनगरात महिलेचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर कुंड रस्त्यावरील एका पुलाजवळील झाडाझुडपात अज्ञात ४० ते ४५ वयोगटातील महिलेचे प्रेत प्लास्टिक कॅरीबॅगेत आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळतात मुक्ताईनगरचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
एका महिलेचा प्रेत कुणीतरी अज्ञाताने पिशवीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांना अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

