• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भल्याभल्यांना न जमणारे काम दिव्यांगांनी केले, साकारले शाडू मातीचे बाप्पा! वृक्ष बीज टाकलेल्या मूर्तीचे दिव्यांग मुलांना मोफत वितरण

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 29, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
0
0
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि.२९ – जिल्ह्यासह सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देखील आयोजित केले जात आहे. जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून विविध आकाराचे गणराया साकारले. विशेष म्हणजे या मूर्ती तयार करताना त्यात वृक्षबीज टाकण्यात आले असून मूर्तीचे दिव्यांग मुलांना मोफत वितरण करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामाध्यमातून असून जिल्हाभर विविध उपक्रम साजरे केले जातात. उडानच्या संस्थापिका हर्षाली चौधरी यांनी कल्याण येथील डॉ.जयश्री कळसकर यांच्या माध्यमातून संस्थेतील कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी, शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणचे आयोजन केले होते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी समाजातील डोळस, सुशिक्षित आणि सदृढ नागरिकांना देखील शक्य होणार नाही अशा शाडू मातीच्या अतिशय सुबक मुर्त्या साकारल्या.

उडाणतर्फे शाडू मातीच्या मूर्ती साकारताना त्यात विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्याने पर्यावरणाला हातभार लागणार असून वृक्ष लागवडीने निसर्ग देखील सुखावला जाणार आहे. पर्यावरणपूरक मूर्तींचे दिव्यांग विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरण करण्यात आले. समाजाकडून दुर्लक्ष होत असलेल्या दिव्यांग मुलांच्या गुणांना वाव देण्याचे काम उडाणतर्फे करण्यात आले आहे. उपक्रमासाठी रुशीलच्या संचालिका हर्षाली चौधरी व सहकारी जयश्री पटेल, सोनाली भोई, हेतल वाणी, आयुषी बाफना व इतरांनी परिश्रम घेतले.

Previous Post

ब्रेकींग! जिल्हा हादरला; महिलेचा मृतदेह आढळला प्लास्टिक कॅरीबॅगत, उडाली खळबळ

Next Post

महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांच करायचं काय? युवासेना – शिवसेना आक्रमक…

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांच करायचं काय? युवासेना - शिवसेना आक्रमक…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!