अमळनेर : तालुका मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धडपडणारे नेते स्व आमदार विनायक मेटे याना मराठा मंगल कार्यालयात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ बी एस पाटील,माजी आमदार स्मिता वाघ , मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष जयवंतराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्याम पाटील ,खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे उपस्थित होते. प्रा डॉ लीलाधर पाटील यांनी विनायक मेटे यांचा जीवनपट व कार्य मांडले. प्रमुख अतिथीनी आपल्या मनोगतातून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेटें चा अपूर्ण राहिलेला लढा पुढे नेऊ तेव्हाच त्यांना खरी श्रद्धांजली मिळेल असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील ,तालुका उपाध्यक्ष संजय पाटील , उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख , महेश देशमुख ,चंद्रकांत काटे ,प्रा श्याम पवार ,प्रा सुभाष पाटील ,प्रा अशोक पवार , डॉ सुमित पाटील , प्रशांत भदाणे ,संजय पाटील , मनोहर पाटील ,भूषण भदाणे , माजी नगरसेवक प्रवीण पाटील, शीतल देशमुख, वालजी पाटील , राकेश पाटील ,जितेंद्र पाटील ,ज्ञानेश्वर पाटील , दर्शना पवार ,तेजराव शिसोदे,गिरीश पाटील ,प्रदीप पाटील , भगवान पाटील,एस आर होलार ,राजेंद्र पाटील यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.


