वरणगाव- पोलीस वृत्त भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाच्या तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याने आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली

याबाबत सविस्तर पोलीसाच्या माहिती नुसार असे की आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवाशी अतूल सतिष वाणी ( ३२ ) रा क्वॉ न १७६ ए ( मोडीफाईड ) हे आपल्या परिवारा सोबत राहत असून बहीण प्रिया सतिष वाणी ( ३२ ) ही यांच्या सोबत राहत होती दि २१ रविवार रोजी सकळी नऊ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातून हतनूर – जवळील तापी नदीच्या पुलावर उडी आत्महत्या केली. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकाच्या लक्षात आल्याने त्यांनी महिलेस पाण्यातून वाचविण्यासाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. उशीर झाल्याने मृत झाले.
मयत महिला घटस्फोटीत असून भावा कडेच राहत होती. घटस्पोट झाल्याने तीच्या मनावर परिणाम झाल्याने या पुर्वीही तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला हतनुर पोलीस पाटील वासुदेव इंगळे यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड करीत आहे

