
जळगाव पोलीस वृत्त यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. डांभुर्णी तालुका यावल येथील अल्पवयीन मुलीला गावतीलच प्रकरणी संशयित निलेश काशिनाथ कुंभार या तरुणाने फुस लावून पडून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी अल्पयीन मुलगी यावल पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने संशयीत निलेश कुंभार याने गुजरात राज्यातील सुरत येथे नेत अत्याचार केल्याची माहिती दिली तसेच त्यानंतर बुधवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ सोडून पळ काढल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले.
अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल कल्याण समिती, जळगाव येथे पाठवण्यात आले. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश कुंभार याचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

