अमळनेर पोलीस वृत्त – अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना निर्बंध बसावा व जास्तीजास्त गुन्हे उघडकीस यावेत याकरीता पोलीस अधिक्षक जळगांव श्री. डॉ. प्रविण मुंढे सो यांनी स्वतंत्र पथक नेमण्याबाबत आदेश दिले होते. त्यावर अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव श्री. रमेश चोपडे सो. व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव सो. यांनी याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले होते. पो. नि. श्री. जयपाल हिरे यांनी पोलीस स्टेशन स्तरावर पोना / मिलीद भामरे पोना / सूर्यकांत साळुंखे, पोना / सिध्दांत सिसोदे, पोकों/ गणेश पाटील, पोकों/निलेश मोरे अश्यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हे मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी नेमले होते. त्यांना वेगेवगळ्या वेळी व ठिकाणी संशयीत वाटणा-या मोटर सायकलचे कागदपत्र तपासणे तसेच रात्रीच्या वेळी फिरणा-या इसमांच्या मोटर सायकलचे कागदपत्र नसल्यास त्या ताब्यात घेणे शहरात कोण विनाकागदपत्र स्वस्त दरात मोटर सायकल विक्री करतो याची गोपनिय माहीती घेवून पंटर पाठवुन मोटर सायकल विकत घेणे अशा वेगेवेगळ्या कुल्पत्या लढवुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सांगितले असता पो. नि. श्री. जयपाले हिरे यांना बातमी मिळाली की, एक इसम हा अमळनेर शहरात चोरीची मोटर सायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. प्राप्त बातमी नुसार नमुद इसमांस ताब्यात घेणेकामी वर नमुद पथकास रवाना केले. पथकाने सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने त्याचे नाव दिपक सुपडु बैसाणे रा. ताडेपुरा, अमळनेर याच्या ताब्यात एक विना नंबरची हिरो एच.एफ. डिलक्स इंजिन क्रमांक HA११EFD९L ४३१७४ चेसिस क्रमांक MBLHA११AED९L१२६८८ अशी मिळुन आली सदर मोटर सायकल बाबत पोलीस स्टेशन कडील अभिलेख तपासले होते. त्यांनतर आरोपी नामे दिपक सुपुडु बैसाणे रा. ताडेपुरा, अमळनेर यांस विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करता त्यांने त्याचा साथीदार नामे गोकुळ गणेश मिल रा. जिराळी ता. पारोळा यांच्या मदतीने खालीलप्रमाणे मोटर सायकल चोरी केले असल्याची कबुली दिली. त्यानंतर वरील पथकाने आरोपी नामे गोकुळ गणेश भिल रा. जिराळी ता. पारोळा यांस देखील अत्यंत शिताफिने त्याचे गांवातून ताब्यात घेतले त्यांनी ५ मोटर सायकल काढुन दिली असुन वरील दोघांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी १) दशरथ भिका कोळी रा. जैतपीर ता. अमळनेर यांचे करवी ०४ मोटर सायकल व गोपाळ सभाजी वानखेडे रा. मंगरुळ ता. अमळनेर यांचे करवी ३ मोटर सायकल सामान्य लोकांना नंतर कागदपत्र देतो असे सांगुन विक्री केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. आत्ता पावेतो चोरीच्या १३ मोटर सायकल हस्तगत करून गुन्ह्यांत चोरी करणारे २ व चोरीच्या मोटर सायकल २ अशा आरोपींना अटक करण्यात आली आहे. कमी किमतीत विना कागदपत्र कोणीही मोटर सायकल विक्री करीत असल्यास नागरीकांनी ती घेवु नये तसेच विना कागदपत्राच्या मोटर सायकल कोणाकडे असल्यास पुढील कायदेशिर कार्यवाही टाळण्यासाठी पोलीस स्टेशनला स्वताहुन जमा काराव्यात अन्यथा चोरणा-यां प्रमाणेच विना कागदपत्र म्हणजेच चोरीच्या मोटर सायकल विकत घेणा-यासही आरोपी केले जाईल असे अमळनेर पोलीस स्टेशन कडुन सांगण्यात आले आहे.

नमुद मोटर सायकल बाबत पोलीस स्टेशन कडील तथा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळला असता त्याबाबत अमळनेर पो.स्टे. गु.र.न. ३३६ / २०२२, अमळनेर पो.स्टे. गु.र.न. ३३९/२०२१, अमळनेर पो.स्टे. गु.र.न. २६२/२०२१, अमळनेर पो.स्टे. गु.र.न. ३६७/२०२२ तसेच मारवड पो.स्टे. ६२/२०२२, धरणगांव पो.स्टे.८५/२०२२, चोपडा शहर पो.स्टे. ४२५/२०२१, चोपडा शहर पो.स्टे. गु.र.न. ३३२/२०२२. चोपडा शहर पो.स्टे. गु.र.न.३३३/२०२२ चोपडा ग्रामीण पो.स्टे. १०३/२०२२ असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो. मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव सो यांच्या सुचनेप्रमाणे व पो. नि. श्री. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने सफी/बापू साळुंके, पोहेकॉ / सुनिल जाधव, पोना / मिलींद भामरे, पोना/ सूर्यकांत साळुंखे, पाना/ सिध्दात सिसोद, पोकों/निलेश मोरे, पोको / गणेश पाटील यांनी बजावली आहे.

