अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज तंबाखू न दिल्याच्या किरकोळ कारणावरून पैलाड भागात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २१) रात्री घडली. मृताचे नाव मुकेश भिका धनगर (३८, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड) असे असून, आरोपी निखिल विष्णू उतकर (४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
फिर्यादी दिनेश भिका धनगर याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजताच्या सुमारास मुकेश घराबाहेर गेला असता हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचे आरोपीशी वाद सुरू झाले. तंबाखू दिली नाही यावरून वाद चिघळला आणि आरोपीने दगड उचलून मुकेशवर वार सुरू केले. दरम्यान, दिनेशने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही आरोपीने दगड मारल्याने तो घराकडे जाऊन मदत बोलवायला गेला.
तो पुन्हा घटनास्थळी परतला असता आरोपी निखिल उतकर हा मुकेशच्या डोक्यात व तोंडावर ओबडधोबड दगडाने वार करत होता. जखमी अवस्थेत मुकेशला दवाखान्यात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
👉 छोट्या कारणावरून घडलेली ही थरारक हत्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.


