“वयाचं भान सुटलं! दुपटीने लहान विवाहितेवर माजी सरपंचाचं प्रेमभूत“

अमळनेर: पोलीस वृत्त न्यूज : तालुक्यातील एका गावात माजी सरपंचाच्या लाजिरवाण्या प्रेमकांडामुळे मोठी चर्चा रंगली आहे. गावातील प्रतिष्ठेचं भान विसरून वयाने दुपटीने लहान व विवाहित असलेल्या महिलेसोबत माजी सरपंचाचे ‘प्रेमभूत’ उफाळून आलं आहे.
गावात अनेक वर्षे राजकारण करून सामाजिक सेवकाची प्रतिमा निर्माण केलेल्या या माजी सरपंचाने वयाचं व जबाबदारीचं भान विसरून आंबट आकर्षण दाखवलं. या अनुचित संबंधांमुळे गावात तोंडघशी पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गावात माजी सरपंचाचा घाणेरडा आणि निर्लज्ज कारनामा उघड झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या विश्वासाचा गैरवापर करून विकासाऐवजी लफडी आणि बेशरमपणाचं राजकारण करणाऱ्या या लफडबाज सरपंचाचं खरे रूप समोर आलं आहे. “उपदेशाच्या गप्पा, पण स्वतःचं आयुष्य सपशेल फस” ….“चापरूशीचा महाराजा – जिथं मोडेल तिथं जमवेल” “अति शहाणा पण त्याचा बैल रिकामा” या म्हणीप्रमाणेच, ना स्वतःकडे काम, ना धंदा; पण दुसऱ्यांच्या आई-बहीणींच्या आयुष्याचा वांदा करायचा, इतपत निर्लज्जपणा या सरपंचाने केला आहे. “दुसऱ्यांच्या प्रेमात काटा, स्वतः मात्र फाटक्या चड्डीत नाचता” “माझ्या जवळ मोठी माणसं आहेत म्हणजे माझं काही कोणी करू शकत नाही,” अशा गर्विष्ठ थाटात हा वावरतो. पण गावकऱ्यांनी सरपंचकी दिली म्हणजे विकासकामे रोखून लफडे करायला सूट दिली असे नाही.
ज्यांच्या घरचं खाल्लं, त्याच्याच घरावर लाळ टपकवणं हा बेशरमपणाचा कळसच म्हणावा लागेल. गावाच्या इज्जतीशी खेळ करणाऱ्या या घाणेरड्या कृत्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले दूध पिणाऱ्या बोक्याला समजते, जग आंधळं आहे आपल्याला कुणी पाहात नाही, हा भ्रम दुधखाऊ बोक्याचा प्रेमकांड उघड झालं आणि लागली मारहाणीची मालिका भांडा फुटताच चांगलेच हाणले!
(संपादक – रजनीकात पाटील 8788441234)

