अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – अमळनेर तालुक्यातील मंगरूळ – शिरुड रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. परिसरातील शिरुड पुढील गावातली विद्यार्थी, व्यवसायिक, कामगार व नागरिकांना दररोज याच रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. अनेक खाजगी वाहने अमळनेर शहराकडे येत असतात. परंतु रहदारीचा हा प्रमुख खड्डेमय झाल्याने दररोजच्या प्रवाशांना प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या दयनीय होत चालली आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. रस्ता पुढे अनेक गावांना जाणारा असल्याने अनेक पुढील गावांसाठी जाणारे एस टी – बसेस व खाजगी चार चाकी तीन चाकी वाहनांचा वापर नियमित आहेत शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, महिला – पुरुष कामगार वर्ग, व्यावसायिक, ह्या खराब रस्त्याचा सामना करावा लागतो आहे. ह्या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. असते. हा रस्ता खराब होण्यासाठी अवजड वाहनेही बऱ्यापैकी कारणीभूत आहेत. वेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे येथून पायी जाणारे, दुचाकी – सायकल स्वार यांना अवजड वाहनांच्या टायरमधून किंवा सायलेन्सरच्या प्रेशरने उडणाऱ्या धुळीचा व खडीचा नेहमीच सामना करावा लागतो. तसेच रस्त्याचा साईट पट्या देखील पूर्णपणे घसरल्या असून. समोरून तर एखादे अवजड वाहन आल्यास दुचाकीवर असल्यास आपली दुचाकी रस्त्याच्या खाली उतरावी लागते रस्त्याच्या साईट पट्ट्या पूर्ण पणे खराब झाल्या असल्याकारणाने अनेक दुचाकी वाहने त्या ठिकाणी घसरतात. रात्रीच्या सुमारास प्रवास करणे अतिशय धोकादायक आहे. नियमीत वापरणारे तसेच स्थानिक नागरिकांसाठी हा रस्ता मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरत आहे.
संपादक: रजनीकांत पाटील (8788441234)

