अमळनेर: प्रतिनिधी पंकज पाटील व्हॉईस ऑफ मीडिया व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने व गोदावरी फाऊंडेशन, जळगाव यांच्या बहुमोल सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ रोजी श्री मंगलग्रह मंदिर अमळनेर वाणी मंगल कार्यालय, अमळनेर वेळ : सकाळी १० वाजता आहे.सर्व पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते व वाटप करणारे आणि श्री मंगळग्रह मंदिराचे सेवेकरी तसेच या सर्वाचे कुटुंबीय यांची मोफत भव्य महाआरोग्य तपासणी व पात्र गरजूची मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगीविशेष अतिथी व शुभेच्छुक म्हणून आपण आमंत्रित आहात. आवर्जून उपस्थित राहावे असे व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस तथा मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष उमेश काटे, सर्व पदाधिकारी व सदस्यव्हॉईस ऑफ मीडिया आणि मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी केले आहे.


